विज्ञान केंद्राचे पी.सी.बी.

इलेक्ट्रॉनिक नियंत्रक

विज्ञान केंद्रात विविध प्रकल्पांसाठी प्रयोग केले जातात. यशस्वी प्रयोगांतून उत्पादन निर्माण व्हावे असा प्रयत्न केला जातो. प्रयोग व उत्पादन यांचा तपशील विविध मुक्त परवान्या-अंतर्गत साऱ्यांसाठी खुला केला जातो. हल्ली अनेक घरगुती उपकरणांसाठी इलेक्ट्रॉनिक नियंत्रक वापरले जातात. त्यामुळे वेळ व ऊर्जा यांची बचत होते. अशा नियंत्रकांच्या आत छोटा संगणक असतो. त्याला मायक्रोकंट्रोलर म्हणतात. ए.व्ही.आर्. हा असा छोटा संगणक आहे.

आर्डुइनो व इतर संगणकीय भाषा

आर्डुइनो, AVR-GCC,असेंब्ली या संगणकीय भाषा वापरून ए.व्ही.आर्. हा मायक्रोकंट्रोलर प्रोग्राम करता येतो. या भाषा वापरून केलेले प्रोग्राम या छोट्या संगणकात भरले की नवनवे उत्पादन तयार करता येते. एखादा नियंत्रक तयार करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक सुटे भाग पी.सी.बी. (PCB) वर सोल्डर केले जातात. नंतर मायक्रोकंट्रोलर मधे हा प्रोग्राम भरला जातो. एखादा नियंत्रक असो वा मायक्रोकंट्रोलरमधे प्रोग्राम भरण्याचे सर्किट असो, त्यांच्या निर्मितीसाठी पी.सी.बी.ची गरज असतेच. अशा ए.व्ही.आर्. संदर्भातील अनेक पी.सी.बी.चे आरेखन (Design) विज्ञान केंद्राने केले आहे. त्यापैकी काही येथे उपलब्ध आहेत. हे सर्व पी.सी.बी. आरेखन GNU-PCB ही मुक्त संगणकीय प्रणाली वापरून केले आहे.

पिंगीप्रॉग (PingyProg)

USBASP या खुल्या AVR-Chip-Downloader वर पिंगीप्रॉग अाधारित आहे. USBASP ची सर्व माहिती इथे मिळेल. या प्रोग्रामरचा वापर करून तुम्ही कोणताही ए.व्ही.आर्. मायक्रोकंट्रोलर प्रोग्राम करू शकता.

की-पॅड

  • मायक्रोकंट्रोलरच्या एकाच (ADC) पिनला हा पी.सी.बी. जोडून पाच बटणे असलेले हे की-पॅड वापरता येते. (buttonAdc.pcb)
  • मायक्रोकंट्रोलरच्या तीन डिजिटल पिन्सना जोडून तीन बटणे वापरण्यासाठी (buttonChange.pcb) हा पी.सी.बी. वापरता येतो.

संदेश-दर्शक (LCD display)

१६ इंग्रजी अक्षरांच्या दोन ओळीत संदेश देता येतो असा संदेश दर्शक lcdmodule.pcb हा पी.सी.बी. वापरून बनवता येतो. याच पी.सी.बी. वर LM35 हा तापमान संवेदक (Temperature Sensor) मायक्रोकंट्रोलरला जोडण्याचे सर्किट उपलब्ध आहे.

टिना (TINAH)

टिना म्हणजे TINAH Is Not Arduino Hardware चे लघुरूप आहे. या पी.सी.बी.वर आवश्यक ते घटकभाग सोल्डर केल्यास बाजारात मिळणारा आर्डुइनो बोर्ड अगदी कमी खर्चात बनवता येतो.

हे सर्व पी.सी.बी. (Creative Commons 0 या लायसेन्स नुसार मुक्त) येथे डाउनलोड करता येतील.


%d bloggers like this: