टाकीतील पाणी

विज्ञान केंद्रातर्फे वरवर साधे वाटणारे अनेक प्रयोग केले जातात आणि त्याच्या मागचे मूळ तत्व अभ्यासले जाते. या वेळच्या प्रयोगात टाकीतील पाण्याची पातळी आणि वेळ यांचा अभ्यास करून एक गणिती प्रतिमान निर्माण केले आणि त्याच्या साह्याने किती वेळात टाकीच्या पाण्याची पातळी किती येते याचा अभ्यास केला गेला.

टाकीतील पाण्याच्या पातळीचा अभ्यास

वर दाखवल्या प्रमाणे एका दंडगोलाकार टाकीत पाणी साठवले आहे. पाणी बाहेर जाण्यासाठी तळापाशी एक छिद्र पाडून त्याला एक नळी जोडली आहे. या छिद्रातून पाणी विशिष्ट वेगाने बाहेर येते.

या प्रयोगाच्या अभ्यासाची  नोंद करणारी पुस्तिका इंग्रजीत येथे उपलब्ध आहे. या पुस्तिकेत पुढील तांत्रिक विवेचन आहेः

  • टॉरिसेलीचे समीकरण वापरून बाहेर येणाऱ्या पाण्याचा वेग कसा निश्चित करता येतो.
  • बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वेग आणि टाकीतील पाण्याची कमी होणारी पातळी यांचा परस्पर संबंध शोधता येतो.
  • हा परस्परसंबंध एका डिफरन्शिअल इक्वेशनने सांगितला जातो.
  • हे डिफरन्शिअल इक्वेशन जी.एन्.यू. ऑक्टेव्ह वापरून सोडवता येते.
  • हा ऑक्टेव्ह प्रोग्राम शेवटी वेळ आणि पाण्याची पातळी यांचा संबंध दाखवणारा आलेख काढून देते.

त्याशिवाय गणिती प्रतिमानावरून लिहिला गेलेला जी.ए्न्.यू. ऑक्टेव्ह चा प्रोग्राम व पुस्तिकेचा लॅटेक् कोड येथे डाउनलोड करता येईल.

%d bloggers like this: