बायनरी टायमर

बायनरी संख्या म्हणजे दोनच चिन्हांनी दर्शवलेली संख्या. संगणक याच प्रकारे संख्यांचा विचार करतो व कार्य करतो. यात केवळ एक व शून्य (किंवा चालू व बंद, उजेड अंधार) अशी दोनच चिन्हे वापरून कितीही लहान वा मोठी संख्या दाखवता येते. विज्ञान केंद्राच्या या प्रकल्पात २५५ मिनिटांपर्यंत काम करू शकणारा टायमर तयार केला आहे. मात्र या संख्या टायमरच्या डब्यावर बायनरी पद्धतीने दाखवल्या जातात.

या टायमरच्या डब्याचा “चेहरा” असा दिसतोः

  1. टायमर चालू करण्यासाठी त्याला विद्युत मंडळाचा २३० व्होल्टचा सप्लाय द्या.
  2. टाइम सेट या नॉबने वेळ मिनिटांमधे सेट करा. ही सेट झालेली वेळ वर दाखवल्या प्रमाणे बायनरी पद्धतीने दिसते. वरील चित्रात १५६ मिनिटे सेट झालेली दिसत आहेत.
  3. त्यानंतर स्टार्ट हे बटण दाबा. म्हणजे पॉवर पॉइंट मधे २३० व्होल्ट रीले चालू झाल्याने उपलब्ध होतील आणि तुमचे विद्युत यंत्र चालू होईल. हा टायमर पाण्याच्या मोटारसाठी वापरून पाहिला आहे.
  4. पुढील १५६ मिनिटे तुमचे विद्युत यंत्र चालू राहील.
  5. टायमर चालू असताना हिरव्या एल्.ई.डी. ची प्रतिसेकंद एकदा चालू बंद अशी स्थिती होते. शिवाय किती वेळ शिल्लक राहिला आहे हे बायनरी पद्धतीने दिसत राहते.
  6. वेळ संपल्यावर विद्युत यंत्रणेला मिळणारी शक्ती रीले बंद झाल्याने बंद होते.
  7. मूळ सेट केलेली वेळ पुन्हा दिसू लागते व पुन्हा या वेळेसाठी टायमर चालवता येतो. ही वेळ बदलायची असेल तर नॉबच्या साह्याने बदलता येते.

हा बायनरी टायमर प्रकल्प इथे डाउनलोड करता येईल. याचा प्रोग्राम असेंब्ली भाषेत लिहिला आहे. असेंब्ली भाषेच्या अभ्यासासाठीही हा प्रकल्प उपयोगी ठरेल. ज्यांना या प्रकल्पात सुधारणा करायची इच्छा असेल त्यांनी मर्क्युरियल व्हर्जन कंट्रोल सिस्टीम वापरल्यास त्यांना अधिक सोयीचे जाईल. इतरांना या फाइल्स त्यांच्या कामासाठी थेट वापरता येतील. हा प्रकल्प मुक्त प्रकल्प आहे. (प्रोग्राम GNU-GPL या परवान्याखाली व आकृती Creative Commons Share Alike या परवान्या खाली मुक्त.)

%d bloggers like this: