हास्य केंद्र -१

तीन शास्त्रज्ञ

एक जीवशास्त्रज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ आणि रसायनशास्रज्ञ समुद्रावर सहलीला जातात. तिथे गेल्यावर त्यांना आपापल्या क्षेत्रात प्रयोग-संशोधन करण्याची हुक्की येते. प्रथम समुद्राच्या लाटांचा अभ्यास करण्याकरता भौतिकशास्त्रज्ञ समुद्रात शिरतो… आणि तो हरवतो.

नंतर जीवशास्त्रज्ञाला समुद्रातील वनस्पती आणि प्राण्यांविषयी फार उत्सुकता वाटते आणि तोही पाण्यात शिरतो. … तो सुद्धा हरवतो.

रसायनशास्त्रज्ञ मात्र किनाऱ्यावर थांबतो आणि निष्कर्ष काढतो-

जीवशास्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ समुद्रात विरघळतात.

पार्टी ?

एकदा एक बेडूक ज्योतिषाला फोन करतो आणि आठवड्याचे भविष्य विचारतो.

“या आठवड्यात एका सुंदर मुलीला तुझ्याबद्दल सारे काही जाणून घेण्यात फार रस असेल. ” ज्योतिषी सांगतो.

“अरेच्चा, माझे ग्रह फार उच्चीचे आहेत की काय ?कोणत्या पार्टीत भेटेल मला ही मुलगी ?” बेडूक विचारतो.

“पार्टीत नाही पण तिच्या जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत भेटेल. ” ज्योतिषी.

नो चार्ज

एकदा एक न्यूट्रॉन एका हॉटेलात जातो आणि विचारतोः

“अहो चहा केवढ्याला मिळतो इथे ? ”

“तुम्हाला नो चार्ज ” विक्रेता उद्गारतो.

शिकार

एकदा तीन संख्याशास्त्रज्ञ हरणाच्या शिकारीला जातात. हरिण टप्प्यात आल्यावर पहिला संख्याशास्त्रज्ञ बार टाकतो. त्याची गोळी एक मीटर वरून जाते. लगेच दुसरा बार टाकतो. त्याची गोळी एक मीटर खालून जाते. तिसरा ओरडतोः “घावली शिकार.”

लाजरे

लाजाळूपणासाठी जबाबदार असलेले गुणसूत्र शोधून काढण्यात त्यांना नुकतेच यश आले होते. पत्रकारांनी या यशा बद्दल त्यांना विचारले असता ते म्हणालेः

“हे गुणसूत्र पूर्वीच सापडले असते. पण ते इतर गुणसूत्रांच्या मागे लपले होते….”

%d bloggers like this: