ऑक्टेव्ह आलेख

ठराविक गणिती संबंध आलेखातून फार उत्तम रीतीने व्यक्त करता येतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील तीन फेजेस ची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एकमेकांपासून १२० अंशांच्या फरकाने फारकत झालेली तीन व्होल्टेजेस हाताने आलेख कागदावर निरनिराळ्या रंगात काढता येतात. पण त्यासाठी खूपच वेळ खर्च होतो. शिवाय व्यक्तिसापेक्ष चुकांना जागा उरतेच. त्या ऐवजी या तीन साइन वेव्ह मधला गणिती संबंध वापरून ऑक्टेव्हच्या मदतीने अचूक आलेख काढायला अगदी कमी वेळ पुरतो आणि तो दिसतोही उत्तम. हे करण्यासाठीचे ऑक्टेव्ह स्क्रिप्ट येथे देत आहे.

clear;
clc();
%divide duration 0-0.05 sec (5 cycles) in 500 intervals
t = linspace(0,0.05,500); 
%frequency is 50 Hz
f = 50;
%amplitude is 330 volts
A = 330;
%for eps output, uncomment following 3 comments
%plot(t,A*sin(2*pi*f*t),"linewidth",3 ,"."); hold on;
%plot(t,A*sin((2*pi*f*t)-(2*pi/3)),"linewidth",3,"-");hold on;
%plot(t,A*sin((2*pi*f*t)-(4*pi/3)),"linewidth",3 ,"+");
%eps output (colourless) lines end. Coloured o/p begins
plot(t,A*sin(2*pi*f*t),"linewidth",3 ,"color","red"); hold on;
plot(t,A*sin((2*pi*f*t)-(2*pi/3)),"linewidth",3,"color","yellow");
hold on;
plot(t,A*sin((2*pi*f*t)-4*pi/3)),"linewidth",3,"color","blue"); 
%Coloured output ends
xlabel("Time");
ylabel("Voltage")
grid minor;

वर हिरव्या रंगात दाखवलेल्या ओळी “कॉमेंट” म्हणून दर्शवून अप्रभावीत केल्या आहेत. या ओळी (% हे चिन्ह काढून) वापरल्या तर आपल्याला असा आलेख मिळतो की जो eps फॉर्मॅट मधे वापरता येतो व छापण्यासाठी योग्य ठरतो. तसे करायचे असेल तर नंतरच्या color हा पर्याय वापरलेल्या ओळी (ओळी 11 ते 14) “कॉमेंट” म्हणून दर्शवा व अप्रभावित करा.

वर दिलेले स्क्रिप्ट ऑक्टेव्ह वापरून चालवल्यावर आपल्याला पुढील आलेख मिळतोः

तीन फेज दाखवलेला आलेख तीन रंगासहित.

या स्क्रिप्ट संबंधी कोणतीही शंका असेल तर संपर्क साधा.

%d bloggers like this: