थ्री फेज विद्युत

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मायक्रोकंट्रोलर या विषयावर मी या विषयाची ओळख करून देणारे भाषण केले होते. संस्थेच्या सचिवांना मी मराठीत बोलू का इंग्रजीत असे विचारल्यावर “हे विचारून तुम्हीच माझा प्रश्न सोडवला आहे” असे ते म्हणाले. ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना (त्यांच्या अनेक शिक्षकांना सुद्धा) मराठीत विषय समजून घेणे सोयीचे जाते असा माझा अनुभव त्यांना मी सांगितला आणि मराठीत बोलण्याचा माझा विचार मी बोलून दाखवला. दीड तास मी मराठीतून विषय मांडला. तंत्रज्ञानाशी काहीही संबंध नसूनही संस्थेचे सचिव पूर्ण काळ बसून राहिले. आणि माझे बोलणे संपल्यावर विषय समजल्याचे त्यांनी स्वतःच सांगितले. माझ्या या अनुभवाने मला फार काही शिकवले आहे.

विज्ञान केंद्राने विज्ञान तंत्रज्ञान मराठीत मांडण्याचे ठरवले त्याला असेच अनुभव कारणीभूत आहेत. मराठीला विज्ञानभाषा बनवण्याच्या अनेकांच्या प्रयत्नांतला विज्ञान केंद्राचा सहभाग म्हणून अशा पुस्तिका विज्ञान केंद्र प्रकाशित करत असते. त्यापैकी एक पुस्तिका ” थ्री फेज विद्युत ” ही येथे प्रकाशित करीत आहोत.

येथे थ्री फेज विद्युत ही मराठी पुस्तिका डाउनलोड करता येईल. (डाय़रेक्ट डाउनलोड साठी राइट-क्लिक करून save link as वर क्लिक करा.)

तुमचा या पुस्तिके बद्दलचा अभिप्राय आम्हाला येथे कळवा. धन्यवाद.

%d bloggers like this: