सौर विद्युत कार्यशाळा

विज्ञान केंद्राच्या वतीने दि. २६,२७ व २८ रोजी “सौर विद्युत” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. १० व्यक्तींनी या कार्यशाळेत भाग घेतला. श्री. प्रसाद मेहेंदळे व श्री. अभिजीत सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.

अशा आणखी कार्यशाळा विज्ञान केंद्रातर्फे या पुढेही घेण्यात येतील. सौर ऊर्जेचा वापर करून स्वयंपूर्ण जीवनाच्या दिशेने सामान्य नागरिकाला पाऊल टाकता येईल. स्वतःच्या विद्युत गरजा कमी ठेवल्या तर फार खर्च न करता देखील ही स्वयंपूर्णता मिळवता येते. इतरांना अशा यंत्रणा बसवून देण्याच्या कामामुळे रोजगार निर्मिती देखील होईल.

या कार्यशाळेचा थोडक्यात आढावा याच संकेतस्थळावर घेतला आहे. त्याखाली चर्चेसाठी जागा ठेवली आहे. सदस्य या विषयावर चर्चा करू शकतात. ही चर्चा इतरांना उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

%d bloggers like this: