स्वतःच पी.सी.बी. बनवा

इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यासाठी पी.सी.बी. वापरणे खूपच सोयीचे असते. स्वतःच पी.सी.बी. बनवण्याची प्रक्रिया पुढे दिली आहे. ही प्रक्रिया विज्ञान केंद्र सदस्य ओंकार देसाई यांनी प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध केली आहे.

नवा इलेक्ट्रॉनिक प्रकल्प करत असताना जोवर सर्किटचे डिझाइन पक्के होत नाही तोवर पी.सी.बी. कारखान्यातून तयार करवून घेणे व्यावहारिक ठरत नाही. व्यावसायिक पी.सी.बी. कारखाने एक तर खूप वेळ घेतात आणि पहिल्या पाच पी.सी.बी. साठी १२०० रु. आकारतात. अशा वेळी घरी किंवा महाविद्यालयातच प्रायोगिक तत्वावर पी.सी.बी. छापणे शक्य असते व योग्य ठरते. त्यासाठी खूपच कमी खर्च येतो. शिवाय सर्व प्रक्रियेवर आपले नियंत्रण राहून वेळही वाचतो. ही प्रक्रिया पुढील प्रमाणेः

१) तुमचा PCB ‘Gnu PCB‘ या सॉफ्टवेअर मधे डिझाइन करा.

२) PCB डिझाइन करुन झाल्यावर त्याचे PS file मधे रुपांतर करा. हे करत असता PCB ची mirror image घेऊ नये.

३) त्यानंतर PCB चा लेआऊट फाेटाे पेपर वर छापा. खालील फोटो पहा.

४) वरील फोटोत दाखवल्या प्रमाणे PCB प्रिंटच्या मापाचा copper clad बोर्ड कापून घ्या.

५) copper clad बोर्ड पॉलीश पेपरने स्वच्छ करा. (फोटोत तांब्याचा पत्रा घासल्यामुळे चकचकीत दिसत आहे.)

६) PCB प्रिंट copper clad वर चिकटवा. खालील फोटोत तांब्याच्या पत्र्यावर पी.सी.बी. छापलेला कागद टेपने चिकटवलेला दाखवला आहे.

७) त्यानंतर त्यावरून १५ ते २० मिनीटे इस्त्री फिरवा. गरम झाल्यामुळे फोटो पेपर वरची शाई copper clad वर उमटते.

८) इस्त्री फिरवून झाल्यावर PCB गार पाण्यात थंड होण्यासाठी टाका.

९) copper clad चिकटलेला फोटो पेपर हाताने घासून काढा.

१०) फोटो पेपरवर छापलेला PCB layout copper clad उमटलेला असेल.

११) मुख्य प्रिंट आणि copper clad वरची प्रिंट तपासा, जर copper clad वरिल ट्रॅक पेपर का़ढताना निघाला असेल तर permanent marker ने दुरुस्त करा.

१२) त्यानंतर copper clad बोर्ड हा etching साठी ferric chloride च्या द्रावणात टाका.

Ferric Chloride चे द्रावण बनवण्याचे प्रमाण :-

पाणी :- २५० मिली.

Ferric Chloride :- २५ ग्रॅम.

१३) Etching करत असताना copper clad दर १५ मिनिटानी बाहेर काढा. नंतर तो द्रावणात टाकून भांडे सतत हलवत रहा.

१४) Etching झाल्यावर ट्रॅक वरची शाई sand paper ने काढून टाका. आता पी.सी.बी. असा दिसतोः

१५) आता PCB वरचे holes ड्रिल करा.

१६) ड्रिलिंग झाल्यावर PCB वरचे ट्रॅक टिन करून घ्या. त्यासाठी साधी सोल्डर गन आणि नेहमीचे सोल्डर मेटल वापरता येते. तयार झालेल्या पी.सी.बी. वर आता योग्य ते घटकभाग जोडता येतील.

वरील पी.सी.बी. विज्ञान केंद्राने प्रकाशित केलेल्या पिंगीप्रॉग या आरेखनाचा आहे. हा पी.सी.बी. वापरून AVR मायक्रोकंट्रोलर्स मधे प्रोग्राम भरता येतात. प्रोग्रामरचे Usbasp हे मुक्त सॉफ्टवेअर येथे मिळेल.

%d bloggers like this: