स्नेह पर्यावरणाशीः गतिमान संतुलन

महाराष्ट्रातील नामवंत पर्यावरण कार्यकर्ते श्री. दिलीप कुलकर्णी यांनी त्यांचे मासिक विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर pdf रूपात थेट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. विज्ञान केंद्र पर्यावरण स्नेही तंत्रज्ञानाचा पुरस्कार करते. श्री. दिलीप कुलकर्णी यांनी पर्यावरणस्नेही जीवनशैली या विषयाला गेली २५ वर्षे वाहून घेतले आहे. त्यांची या विषयावरील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मुलाखती इंटरनेटवरही आपल्याला पहायला मिळतात. अत्यंत तळमळीने या विषयावर अभ्यासपूर्ण भाष्य करणारा कर्ता सुधारक असे त्यांचे वर्णन करता येईल. विज्ञान केंद्राच्या वाचकांना त्यांचे हे अंक (निःशुल्क) अवकरण करून वाचता येतील.

त्यांच्या मासिकाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया त्यांच्याशी थेट संपर्क साधून कळवू शकता.  आमच्याशी संपर्क साधून कळवलेल्या प्रतिक्रिया त्यांच्या पर्यंत पोचवल्या जातील. या मासिकाची वार्षिक वर्गणी रु. ३० मात्र आहे.  ती वर्गणी भरण्याचा पत्ता गतिमान संंतुलनच्या अंकात दिलेलाच असतो (वरील अंक पहा).  सर्व वाचकांना अशी विनंती आहे की त्यांनी ही वर्गणी पाठवून हा अंक रितसर मिळवावा.  धन्यवाद.

%d bloggers like this: