घरोघरी पिकवा भाजी

कितीही लहान किंवा मोठे घर असो. स्वतःची भाजी स्वतःच पिकवता येते. विज्ञान केंद्र रसायनविरहित शेती, बाग यांचा सातत्याने पाठपुरावा करत आले आहे. गच्चीत, अंगणात, छपरावर अशी भाजी पिकवता यावी यासाठी सुंदर गादी वाफा बनवता येतो. त्याची ओळख या लेखात करून देत आहोत. “घर तेथे भाजीबाग” हे उद्दिष्ट साध्य करण्याची ही एक पायरी म्हणता येईल.

चौरस फुटांची शेती

आकृतीत एक चौरसाकृती गादी वाफा दाखवला आहे. चार फूट लांब, चार फूट रुंद आणि दहा इंच उंच या आकाराच्या “डब्यात” दर चौरस फुटात एक भाजीचे रोप लावलेले दाखवले आहे. या वाफ्याचा तपशील पुढील प्रमाणेः

  •  सिमेंट, फ्लाय अँश एकत्र करून त्यापासून तयार केलेले ठोकळे (२४ इंच x १० इंच x ४ इंच या मापाचे) शेजारी दाखवल्याप्रमाणे वापरून डब्याच्या “भिंती ” तयार केल्या जातात.
  • याच आकाराची दणकट, १० वर्षे टिकू शकेल अशी पिशवी या डब्यात ठेवली जाते. या पिशवीला पाण्याचा निचरा होण्यासाठी तळाशी छिद्रे पाडलेली असतात.
  • या पिशवीत १/३  माती, १/३ कोकोपीट आणि १/३ चांगले कुजलेले शेणखत असे चांगले मिसळून भरले जाते.
  • १६ चौरस फुटांच्या या तयार वाफ्यात वर दाखवल्या प्रमाणे आपण सोळा रोपे लावू शकतो.

असे वाफे तयार करून आपल्याला स्वतःच्या घरात भाजी लावता येईल. एक वाफ्यातील भाजी नीट नियोजन केले तर चार जणांच्या एक कुटुंबासाठी आठवड्यातून एक दिवस भाजी देऊ शकेल असा अंदाज आहे.

हा वाफा विकतही घेता येतो. तो साधारण रु. ३००० ला मिळेल. वाहतुक खर्चात बदल होऊ शकेल. या किंमतीचा विचार करता, असे ७ भाजी वाफे रोज घरची भाजी मिळावी यासाठी उपयोगी ठरतील. हल्ली शेतजमीन विकत घेणे महाग होते आहे. त्या ऐवजी आपल्याच अंगणात, गच्चीत किंवा छपरावरही अशा गादी वाफ्यात भाजी पिकवता येईल. शेतावर जाण्यायेण्याचा वेळ, खर्च वाचेल आणि रसायन विरहित शुद्ध ताजे अन्न आपण घरीच मिळवू शकू.

विज्ञान केंद्राचे हितचिंतक रुपक साने आणि आदित्य धारप यांनी असे वाफे विक्रीसाठी तयार ठेवले आहेत. पुढील फॉर्म वापरून तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता.

 

%d bloggers like this: