रोग्यांसाठी अवघड कोडे

व्यक्तीला एखादा आजार झाला किंवा कसे हे ठरवण्यासाठी रक्त परीक्षण, विविध प्रकारचे स्कॅनिंग, क्षकिरण चिकीत्सा अशा गोष्टी केल्या जातात. मात्र त्यामुळे आजाराचे निश्चित निदान करणे नेहमीच शक्य होेत नाही. अशा एका काल्पनिक चिकीत्सापरीक्षणाचे (अशी परीक्षणे विविध औषध कंपन्यांकडून नेहमी जाहीर केली जातात) उदाहरण पहाः

एक रोग एकूण लोकसंख्येच्या १ टक्का लोकांना होतो असे निदर्शनास आले आहे. या रोगावर उपाय नाही. यासाठीचे चिकीत्सापरीक्षण (screening test) ९० टक्के अचूक ठरले आहे. जर तुमच्या बाबतीत हे परीक्षण रोग दर्शवीत असेल तर तुम्हाला तो आजार असण्याची किती शक्यता आहे ?

बहुतेक लोक वर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ९० टक्के असे देतात, आणि आता तुम्ही मृत्युपत्र लिहायला घ्यावे असे त्यांना वाटते. हे परीक्षण ९० टक्के बिनचूक आहे या कारणामुळे तुम्हाला हा आजार असण्याची शक्यता ९० टक्के आहे असे त्यांना वाटणे साहजिकच आहेपण

९० टक्के अचूकता ही त्या परीक्षण प्रक्रियेसंबंधी सांगितली आहे. याचा अर्थ तुम्हाला जर हा आजार असेल आणि तुम्ही हे परीक्षण करून घेतलेत तर तुमचा आजार या परीक्षणात दिसून येण्याची शक्यता ९० टक्के आहे. किंवा हा रोग झालेल्या १०० रोग्यांपैकी फक्त ९० रोग्यांचा आजार या परीक्षणात दिसून येईल असा याचा अर्थ आहे. आणि इथेच मेख आहे !

हे सारे आणखी सोपे करून सांगायचे तर असे सांगता येईलः समजा १००० लोकांपैकी १० लोकांना रोग झाला आहे (कारण हा रोग एकूण लोकसंख्येच्या १ टक्काच लोकांना होतो). त्यापैकी ९ लोकांचा रोग या परीक्षणात दिसून येईल. उरलेल्या एका रोग्याचा रोग या परीक्षणात सापडणार नाही. पण हे परीक्षण उरलेल्या ९९० लोकांसाठीही (केवळ) ९० टक्के() अचूक निदान करते. म्हणजेच ९९० च्या दहा टक्के (९९) इतके रोगी त्यांना रोग नसूनही या परीक्षणाच्या मते रोगी ठरतात. एकूण (९९+=) १०८ व्यक्ती या परीक्षणानुसार रोगी ठरतात. पण त्यापैकी फक्त ९ व्यक्तीच खरोखर या रोगाने आजारी असतात.

तुम्हाला या परीक्षणाने रोगी ठरवले असेल तर तशी शक्यता केवळ १०८ पैकी ९ इतकीच (.३३ टक्के) आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. तुमचे अज्ञान हाच आमचा फायदा हे बोधवाक्य असणाऱ्या धंदेवाईक वैद्यकापासून सुजाण रोगी आणि त्यांची काळजी घेणारे डॉक्टरच सामान्य जनतेचा बचाव करू शकतात .

(डॉ. मार्गारेट मॅकार्टने या ब्रिटिश लेखिकेच्या “The Patient Paradox” या पुस्तकातून.)

 

%d bloggers like this: