माहिती साक्षरतेची ओळख

माहिती साक्षरता कार्यशाळा
कार्यशाळेत विद्यार्थी पार्थ आणि उदय ओक सर

माहिती साक्षरतेची ओळख करून देण्यासाठी माहिती तज्ञ श्री. उदय ओक यांनी विज्ञान केंद्रात गुरुवार, १९ सप्टेंबर २०१९ रोजी एक कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत, व्यावसायिक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीक सहभागी झाले होते.

आपल्या दैनंदिन जीवनात माहितीचा मारा आपल्यावर सदैव होत असतो. त्या माहितीचा योग्य तो अर्थ लावण्यासाठी शालेय अंकगणितसुद्धा अनेकदा पुरेसे उपयुक्त ठरते. अशा शालेय ज्ञानाचा वापर करूनही माहितीतून योग्य ज्ञान मिळवता येते.

टक्केवारी सारख्या प्राथमिक गणिती कौशल्यातूनही अनेक प्रकारची माहिती आपल्याला महत्वपूर्ण ज्ञान देते. मात्र आपण ते मिळवण्यासाठी चिकाटी दाखवणे गरजेचे असते हे श्री. ओक यांनी सोदाहरण स्पष्ट केले. टक्केवारी व्यतिरिक्त इतर गणिती कौशल्ये वापरून अधिक विश्लेषण करता येते. त्या संबंधी कार्यशाळा पुढील काळात घेण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींना अशा कार्यशाळेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी विज्ञान केंद्राशी जरूर संपर्क साधावा.

%d bloggers like this: