विज्ञान केंद्रातर्फे पायथन या मुक्त संगणकीय भाषेची ओळख करून देण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
संख्या पूर्ण भरल्यामुळे या कार्यशाळेसाठी प्रवेश देणे आता बंद झाले आहे.
त्या कार्यशाळेची अधिक माहिती पुढील प्रमाणेः
- कार्यशाळेच्या तारखाः शनिवार, ४ जानेवारी व रविवार, ५ जानेवारी २०२०
- वेळः रोज सकाळी ९ः०० ते १२ः००, दुपारी २ः०० ते ५ः००
- स्थळः विज्ञान केंद्र कार्यालय- सी. २३,२४ मानसनगरी, शिवाजी चौक तळेगाव स्टेशन ४१०५०७.
- कार्यशाळेतील अभ्यासक्रमः
- शनिवार, ४ जानेवारीः
- सकाळः लिनक्स टर्मिनल व मिडनाइट कमांडर एडिटरची ओळख
- दुपारः पायथनच्या प्राथमिक आज्ञा, साधी सोपी स्क्रिप्ट्स लिहिणे व टर्मिनलवर चालवणे.
- रविवार, ५ जानेवारीः
- सकाळः लिस्ट व डिक्शनरी या संकल्पनांची ओळख व वापर
- दुपारः if-else, while व for यांचा वापर करून स्क्रिप्ट्स लिहिणे व चालवणे
- शनिवार, ४ जानेवारीः
- दुपारी १२ः०० ते २ः०० ही वेळ जेवणाची राहील. जेवणाची सोय प्रत्येकाने स्वतः करायची आहे.
- जास्तित जास्त १० व्यक्तींना कार्यशाळेत प्रवेश दिला जाईल. प्रथम नोंदणी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. प्रत्येकाने स्वतःचा लिनक्स व पायथन बसवलेला संगणक आणणे अपेक्षित आहे.
- शैक्षणिक पात्रताः या कार्यशाळेत संगणकाची नीट ओळख असणारी व १२ वी पास झालेली व्यक्तीच सहभागी होऊ शकेल. प्रोग्रामिंगचा अनुभव असणे अपेक्षित नाही.
- या विषयातील तज्ञ व्यक्ती कार्यशाळेत मार्गदर्शन करतील.
- ही कार्यशाळा संपूर्णपणे निःशुल्क आहे.