होमिओपॅथी

होमिओपॅथी ही ३६७ वर्षांपूर्वी डॉ. हानेमान यांनी संशोधित केलेली एक प्रभावी उपचारपद्धती आहे. सामान्य लोकांना ती साबुदाण्याच्या गोळ्या म्हणून परिचित आहे. लोकांचा हाही गैरसमज आहे की होमिओपॅथिक औषधांनी रोगी बरा करण्यासाठी खूप वेळ लागतो.

होमिओपॅथिक औषधे ही घेण्यास अत्यंत सोपी असून अत्यल्प दरात उपलब्ध होतात व त्यांचा कोणताही दुष्परिणाम (side effect) शरिरावर होत नाही. कारण ह्या औषधांची मात्रा ही क्रूड फॉर्ममध्ये नसते. उलट ह्या औषधांची गुणवत्ता ही Potentisation पद्धतीने (अतिसूक्ष्म – nanoparticles) वाढवलेली असते.

या लेखात आपण प्राथमिक आजारात घरगुती उपयोगाची होमिओपॅथिक औषधे बघूयात.

जखमांवरील उपचार

  1. Arnica montana 30 आर्निका – पडल्यामुळे, मुका मार, खरचटणे यावरील प्रभावी औषध. मारामुळे रक्त साकळणे, मार लागलेला भाग काळानिळा होणे, अंग मोडल्यासारख्या वेदना होणे. कठीण भागावर झोपल्यावर वेदना वाढणे.
  2. Hypericum 30 हायपेरिकम – हे औषध नसतंतूंवरील दाहावर काम करते. हाताच्या व पायाच्या बोटांच्या नसतंतूदाह किंवा नखे दुखणे यावर प्रभावी काम करते. भोसकल्यानंतर, ऑपरेशननंतर किंवा प्राण्यांच्या डंखानंतर होणाऱ्या अतिशय तीव्र वेदना. ह्या वेदना अतितीव्र स्वरुपाच्या असतात. कधीकधी अतितीव्र वेदनांबरोबरच दुखऱ्या भागात बधिरपणा जाणवतो.
  3. Calendula 30 कॅलेंड्युला – हे औषध जखम झाल्यानंतर किंवा खरचटल्यानंतर होणाऱ्या उघड्या जखमांवर काम करते. हे औषध पोटातून घेता येते, तसेच बाहेरून जखमेवरदेखील लावता येते. ह्या औषधामुळे व्रणावर नवीन पेशींची निर्मिती होण्यास मदत होते. जुनाट, न भरणाऱ्या जखमांवरदेखील हे औषध उपयोगी पडते.
  4. Hamamelis virginiana 30 हॅमेमॅलिस – अपघातानंतर, किंवा पडल्यावर होणाऱ्या उघड्या जखमा, ज्यामध्ये अतिशय तीव्र वेदना होतात, अशा ठिकाणी हे औषध उपयोगी पडते. याचबरोबर जखमांमधून अतिप्रमाणात रक्तस्त्राव होतो. दुखऱ्या भागात फुगल्यासारख्या वेदना होतात. ह्याचप्रमाणे अतिशय अशक्तपणा जाणवतो. भाजल्यावर होणाऱ्या जखमांवर घरगुती उपाय म्हणून वापरू शकतो.
  5. Rhus tox 30 ऱ्हस टॉक्स – हे औषध स्नायू, कुर्चा यावर काम करते. अतिश्रमानंतर स्नायूदाह किंवा कुर्चांना इजा होणे यावर प्रभावी. ह्या औषधामध्ये आखडलेल्या स्नायूंच्या वेदना जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे ह्या रुग्णाला सतत शरिराच्या हालचाली केल्यावर बरे वाटते.

टीप

वरील औषधे ही प्राथमिक उपचारांसाठी नमूद केलेली आहेत. ही औषधे 30 Potency मध्येच वापरावीत. ह्या औषधांच्या ४ गोळ्या त्रास व्हायला लागल्यापासून दर १ – १ तासाने दोन दिवस घ्याव्यात. तरीसुद्धा त्रास होत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. सोनल खळदे (B.H.M.S., M.D.)

 

 

%d bloggers like this: