घरगुती कामांसाठी कोष्टकप्रणाली (spreadsheet)

अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यातील जिनीप्रमाणे कंप्युटरही आपल्याला मदत करतो, आपल्याला फक्त त्याला समजेल अशा भाषेत आज्ञा देता आल्या पाहिजेत. कुठलेही काम कंप्युटरच्या मदतीने सोपे होते, फक्त सुरुवातीला ते शिकून, वेळ काढून व्यवस्था बसवणे महत्त्वाचे असते. आज आपण कोष्टकप्रणाली वापरून घरगुती कामे कशी करता येतील, हे बघूया.

कोष्टकप्रणाली उघडली, की उभ्या आडव्या रेघा मारून तयार केलेल्या असंख्य चौकटी दिसतात. या वापरून, आणि त्यावर प्रक्रिया करून आपण पुढील कामे करू शकतो.

मुख्य सोयी

गणिते – (calculations)उदा. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, सरासरी काढणे, आणि इतर असंख्य गोष्टी.

विल्हेवारी – (sorting) – अकारविल्हे, तारखेप्रमाणे याद्या करणे.

चाळणी – (filtering) – हव्या त्या प्रकारच्या गोष्टी निवडणे.

घरगुती कामांपैकी पुढील कामे करता येतात

  1. घरखर्चाचे हिशोब ठेवणे.
  2. कुठल्या कारणासाठी किती खर्च झाला त्याची वर्गवारी करणे.
  3. दुधाचा, पेपरचा हिशोब ठेवणे.
  4. मोठ्या खर्चाची पूर्ण माहिती लिहिणे.
  5. भरलेल्या बिलांचा ताळा करणे.
  6. बॅंकेच्या पासबुकाचा ताळा करणे.
  7. गुंतवणुकीबद्दलची माहिती व त्यासंबंधीचे हिशोब, तारखा इत्यादि.
  8. कामांची यादी करणे.
  9. वार्षिक वेळापत्रक तयार करणे.

कोष्टकप्रणाली वापरून इतरही असंख्य कामे करता येतात. सुरुवात करण्यासाठी वरील कामांपैकी काही उपयोगी पडतील. त्यानंतर इतर कामांना हात घालता येईल. या प्रकारची कामे केल्याने घरखर्चाचे उत्तम नियोजन करता येईल. विज्ञान केंद्रात संगणकावरची कोष्टक प्रणाली वापरून कामे करण्याचे प्रशिक्षण निःशुल्क दिले जाते.

 

%d bloggers like this: