आरोग्याचे मोजमाप वजन आणि उंची – बॉडी मास इंडेक्स (BMI)

माझे वजन बरोबर आहे का? जास्त तर नाही? कमी तर नाही? उंची कशी वाढेल? असे प्रश्न आपल्याला सारखे पडत असतात.

ह्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आपल्याला असे एक मोजमाप हवे आहे, जे आजार लांब ठेवण्यासाठी योग्य वजन सुचवू शकेल. ह्यालाच आपण बॉडी मास इंडेक्स (उंची वजनाचे गुणोत्तर) असे म्हणतो.

गणिती सूत्र

प्रत्येकाच्या उंचीनुसार एक योग्य वजन असते. ते पुढीलप्रमाणे –

BMI = (weight in kg) / (height in meters)2

  • BMI हे आपल्या शरीरातील मेदपेशींची कल्पना देते.
  • म्हणजेच जर आपला BMI जास्त तर चरबी जास्त.
  • म्हणजेच आजाराला आमंत्रण
  • ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमधे चरबीचे अडथळे आले तर थेट मृत्यूलाच निमंत्रण.

किती असावे वजन -उंची गुणोत्तर?

प्रौढांसाठी

तर योग्य BMI किती असावा? 18.5 ते 25 ह्या दोन्हीच्या मध्ये असावा. ही लक्ष्मणरेषा ओलांडली तर स्थूलता आणि अति स्थूलतेमुळे मधुमेह, ह्रदयरोग, कर्करोग यासारखे असंख्य आजार आपला पिच्छा पुरवणार, आणि 18.5 पेक्षा कमी असल्यास आपल्याला कुपोषण आणि त्याच्याशी निगडीत आजारांना सामोरे जावे लागेल.

लहान मुलांसाठी

लहान मुलांसाठी BMI हा 15 ते 22 मधे असावा.

म्हणून निरामय आयुष्य जगायचे असेल तर या दोन जादुई आकड्यांबद्दल जागरूक राहणे. BMI च्या सीमारेषांचे पालन केले की आजाराच्या राक्षसाला चार हात दूर ठेवता येईल.

तर मग आजच बघा आपला BMI किती आहे ते.

–डॉ. आश्लेषा दांडेकर, तळेगाव

 

%d bloggers like this: