करोनाः आणखी काही प्रश्नोत्तरे

प्रा. भाग्यश्री गाडगीळ यांनी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या करोना विषाणुंसंबंधी माहितीचे पुढील भाषांतर पाठवले आहे. त्यातून आणखी काही गैरसमजुती नष्ट होण्यास मदत होईल.

करोना विषाणू उष्ण व दमट हवामानात पसरू , फैलाऊ शकतो का?

आत्तापर्यंतच्या पुराव्यानुसार करोना विषाणू उष्ण व दमट हवामानातसह कुठल्याही ठिकाणी फैलाऊ शकतो.
कुठल्याही वातावरणात जरी तुम्ही राहात असलात तरी.
तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी करोनाची लागण झाली असल्यास,
किंवा लागण झालेल्या प्रदेशातून तुम्हीं प्रवास केला असेल तर,
तुम्ही, करोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेणें आवशक आहे.
तुमचे हात वारंवार धूणे, हा करोना पासून वाचण्याचा उत्तम उपाय आहे. असे केल्यामुळे तुमच्या हातावर जर करोना विषाणू असेल तर तो निघून जातो, व डोळयाला, तोंडाला किवा नाकाला हात लावल्यामुळे होणारी लागण टळते.

थंड हवेत किंवा बर्फात नवीन करोना विषाणू मरत काय ?

थंड हवेत करोना विषाणू किंवा इतर कुठलाही विषाणू मरतो असे मानण्याचे काही कारण नाही.
बाहेरचे तापमान किंवा हवामान कसेही असले तरी ,सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीराचे तापमान ३६.५ ते ३७Oc असते. HAND SANITIZER किंवा साबण व पाण्याने हात धूणे हा करोना पासून वाचण्याचा उत्तम उपाय आहे.

गरम पाण्याने अंघोळ करण्यामुळे करोना विषाणूला अटकाव करता येतो का ?

गरम पाण्याने अंघोळ केल्याने करोनापासून बचाव होऊ शकत नाही. तुमच्या अंघोळीच्या पाण्याचे तापमान काहीही असले तरी तुमच्या शरीराचे तापमान ३६.५ ते ३७Oc च राहते. वस्तुतः खूप गरम पाणी अंघोळीसाठी वापरले तर तुमचे शरीर भाजू शकते. HAND SANITIZER किंवा साबण व पाण्याने हात धूणे हा करोना पासून वाचण्याचा उत्तम उपाय आहे.. असे केल्यामुळे तुमच्या हातावर जर करोना विषाणू असेल तर तो निघून जातो, व डोळयाला, तोंडाला किवा नाकाला हात लावल्यामुळे होणारी लागण टळते.

नवीन करोना विषाणू हा डासांच्या चावण्यामुळे पसरतो काय ?

आतापर्यंत असा कुठलाही पुरावा किंवा माहिती मिळालेली नाही ज्यामुळे असे म्हणता येईल कि डासांच्या चावण्यामुळे करोना विषाणू पसरतो. नवीन करोना विषाणू हा श्वसन मार्गात राहणारा विषाणू आहे . या विषाणूचा प्रसार हा खोकण्या शिंक्ण्यातून उडणाऱ्या तुषारांमार्फत किंवा लाळेतून ओघळणाऱ्या किंवा नाकातू गळणाऱ्या पाण्यामार्फत पसरतो. HAND SANITIZER किंवा साबण व पाण्याने हात धुणे हा करोना पासून वाचण्याचा उत्तम उपाय आहे.. तसेच खोकला किंवा सर्दी झालेल्या माणसांपासून दूर रहा.

करोना विषाणूला मारण्यासाठी hand dryer उपयुक्त आहे का?

करोना विषाणूला मारण्यासाठी hand dryer तितका उपयोगी नाही. HAND SANITIZER किंवा साबण व पाण्याने हात धुणे हा करोना पासून वाचण्याचा उत्तम उपाय आहे. हात धुऊन झाल्यावर ते पेपर NAPKIN ने किंवा गरम हवेच्या झोताने कोरडे करा.

अतिनील किरण (uv rays) निर्जंतुकीकरण दिव्याने, करोना विषाणू मरतो का?

अतिनील किरणांचा दिवा हाताचे किंवा त्वचेचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरू नये, अतिनील किरण त्वचेला त्रासदायक ठरू शकतात.

करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना ओळखण्यासाठी वापरले जाणारे Thermal Scanner किती परिणामकारक आहेत? .

Thermal Scanner हे करोना विषाणूची लागण झाल्यामुळे ताप आलेल्या रूग्णांना ओळखू शकते. मात्र ज्या लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे, पण ताप आलेला नाही अश्या रुग्णांना Thermal Scanner ओळ्खू शकत नाही. कारण ज्या लोकांना लागण झाली आहे, ते तापाने आजारी पडण्यासाठी २ ते १० दिवसाचा कालावधी लागू शकतो.

अल्कोहोल किंवा क्लोरीन सर्व शरीरावर फवारले तर करोना विषाणू मरतो का?

अल्कोहोल किंवा क्लोरीन सर्व शरीरावर फवारले तरी जर करोना विषाणूने शरीरात प्रवेश केला असेल तर तो मरत नाही. अशी फवारणी डोळे व तोंडाला धोकादायक ठरू शकते. कपड्यांची हानी होऊ शकते. तज्ञ व्यक्तींच्या देखरेखी शिवाय अल्कोहोल किंवा क्लोरीनने निर्जंतुकीकरण करू नये.

न्युमोनियासाठी दिली जाणारी लस करोना विषाणूपासून बचाव करू शकते का?

नाही, न्युमोनियासाठी किंवा Haemophilus influenza type B (Hib) साठी दिली जाणारी लस करोना विषाणूपासून बचाव करू शकत नाही.
हा विषाणू नवीन व वेगळा असल्यामुळे त्याच्यापासून बचाव करणारी वेगळी लस तयार करावी लागेल. शास्त्रज्ञ व संशोधक यासाठी प्रयत्न करीत आहेत. जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) यासाठी त्यांना पाठबळ देते आहे.
ह्या लसी जरी परिणामकारक नसल्या तरी, श्वसनमार्गाच्या आजारांसाठी त्या उपयुक्त आहेत. तुमच्या आरोग्यासाठी त्या घेण्याची शिफारस केली जाते.

नवीन करोना विषाणूची लागण रोखण्यासाठी नियमितपणे सलाईनने नाक धुतल्यास, उपयोग होतो का?

नाही. नियमितपणे सलाईनने नाक धुतल्यास, नवीन करोना विषाणूची लागण रोखण्यासाठी उपयोग होतो असा कुठलाही पुरावा नाही.
काही वेळेला आपल्याला होणारी नेहमीची सर्दी बरी होण्यासाठी नियमितपणे सलाईनने नाक धुण्याचा उपयोग होतो. परंतु श्वसनमार्गातील संसर्ग बरा होण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही.

लसूण खाल्यामुळे करोना विषाणूची लागण होण्यापासून बचाव होतो का?

लसूण हा आरोग्यासाठी चांगला असतो, व तो सूक्ष्मजीव रोधक आहे. परंतु लसूण खाल्यामुळे करोना विषाणूची लागण होण्यापासून बचाव होतो असे आजवर दिसून आलेले नाही.

नवीन करोना विषाणूची लागण वृद्धांनाच होते की तरुण लोकही त्याला बळी पडतात?

नवीन करोना विषाणूची लागण ही कोणत्याही वयाच्या लोकांना होऊ शकते. वृध्द लोक व ज्या लोकांना दमा, मधुमेह, ह्रदरोग ह्या पैकी काही आजार असेल त्यांना नवीन करोना विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असते.
सर्व वयाच्या लोकांनी करोना विषाणू पासून वाचण्यासाठी, खालीलप्रमाणे काळजी घ्यावी असे जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) म्हणतेः-

  • हातांची उत्तम स्वच्छता
  • श्वसना मार्फत विषाणूची लागण होऊ नये म्हणून काळजी.

नवीन करोना विषाणूच्या उपचारासाठी antibiotics उपयोगी आहेत का?

नाही, antibiotics विषाणूच्या विरोधात कामी येत नाहीत. antibiotics फक्त जीवाणूंना मारू शकतात.
नवीन करोना हा विषाणू असल्यामुळे त्याच्या उपचारासाठी antibiotics वापरू नये . पण जर तुम्ही करोना विषाणूची लागण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये असाल तर इतर जिवाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून तुम्हाला antibiotics दिले जाऊ शकते.

असे कोणते विशिष्ट औषध आहे का की जे करोना विषाणू पासून वाचण्यासाठी किंवा त्याच्या उपचारासाठी वापरले जाते?

आजमितीला तरी असे कोणतेही औषध नाही की जे करोना विषाणू पासून वाचण्यासाठी किंवा त्याच्या उपचारासाठी वापरले जाऊ शकते.
परंतु, करोनाची लागण झालेल्या व्यक्तींची योग्य उपचाराने काळजी घेतली पाहिजे, आणि जे लोक जास्त आजारी आहेत त्यांना उत्तम पूरक उपचार दिले पाहिजेत. काही विशिष्ठ उपचारांसाठी संशोधन व प्रयोगशाळेत चाचण्या चालू आहेत. संशोधन वेगाने पूर्ण होण्यासाठी विविध संशोधकांना जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) मदत करत आहे.

%d bloggers like this: