दूर नियंत्रक

रात्री दमून भागून झोपताना आधी दिव्याच्या उजेडात  अंथरुणात पडायचे. नंतर झोपण्याआधी रिमोट कंट्रोल वापरून खोलीचा दिवा बंद करायचा. तेवढ्यासाठी उठायला नको. या साठीचे सर्किट तुम्हाला स्वतःलाच बनवता येईल. विज्ञान केंद्राने या प्रकल्पाचे डिझाइन करून तुमच्यासाठी खुले केले आहे.

  • एक चांगला प्रखर टॉर्च आणि एक इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरून हे करता येते.
  • कोणतेही प्रोग्रामिंग करण्याची गरज नाही.
  • साहित्य खर्च सुमारे २०० रु. फक्त.
  • सोल्डरिंग खेरीज इतर कोणत्या कौशल्याची गरज नाही.
  • क्रिएटिव्ह कॉमन्स लायसेन्स खाली हा प्रकल्प खुला केला आहे. त्यामुळे व्यावसायिक कारणासाठी वापरण्यास पूर्ण व निःशुल्क परवानगी.
  • प्रकल्प आरेखनः विज्ञानदूत
  • पी.सी.बी. आरेखन,रचना आणि परीक्षणः ओंकार देसाई

    अधिक माहिती व अवकरण (डाउनलोड).