पर्यावरण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. दिलीप कुलकर्णी यांच्या गतिमान संतुलनचा ऑक्टोबर २० चा अंक प्रसिद्ध झाला.
अनेक वाचक या अंकाबद्दल विचारणा करीत असतात. श्री. दिलीप कुलकर्णी यांनी पर्यावरणवादी विचारांचा प्रसार व्हावा म्हणून इ-अंक येथे उपलब्ध करून देण्याची विज्ञान केंद्राला परवानगी दिली आहे. तथापि आम्ही विज्ञान केंद्रातर्फे असे सुचवतो की वाचकांनी त्या अंकाची वर्गणी भरून (वार्षिक ३० रु. मात्र) हा अंक श्री. कुलकर्णींकडून थेट मिळवावा. तसे करण्याने छापील अंकाचे सर्व फायदे वाचकांना मिळतीलच. पण तो अंक (स्वतः वाचल्यानंतर) शेजारी व मित्रांना देखील चटकन वाचायला देता येईल.
वर्गणी भरण्याचा पत्ता प्रत्येक अंकात छापलेला असतोच.