मुखपट्टी असूनही संवाद? वाटतं तितकं सोपं नाहीये ते!

गेले कित्यॆक महिने आपल्याला नाईलाजामुळे मुखपट्टी वापरावी लागते आहे, त्याची आपल्याला हळूहळू सवयही झाली आहे. त्याचा आपल्या खाजगी जीवनावर, तसेच सामाजिक संबंधांवर आणि संवादावर काय परिणाम होतो, ते पाहूया.

फोटोसाठी सौजन्य

बाहेर पडताना मास्क लावायचा, हे आता आपण नाइलाजाने का होईना, मान्य केलं आहे. पण यामुळे परस्परसंवादावर विपरीत परिणाम होतो, हे मान्य करावेच लागेल.

शब्दावाचून संवाद म्हणजे काय? आपण अगदी थोडा वेळ एकमेकांना भेटलो, तरी, आपल्या नकळत काही शारीरिक हालचाली करतो, आणि त्याद्वारे संदेश पाठवतो, उदा. स्मितहास्य. जरी आपल्याला वाटलं, की आपण बोलतो, तेच जास्त महत्वाचं आहे, तरी वास्तविक निःशब्द संवादाद्वारेच आपण भावना व्यक्त करतो, एखाद्या गोष्टीवर भर देतो आणि संवाद चालू ठेवतो. ह्या गोष्टी आपल्या आतून येत असतात.

वेगवेगळ्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे, की आपण दुसऱ्या माणसांपर्यंत माहिती पोहोचवताना फक्त ७% शब्द वापरतो, तर ३८% आवाज आणि ५५% शारीरिक संवादाचा वापर करतो. भावना, विचार आणि मते आपल्या शारीरिक संवादातून आणि आवाजातून प्रकट होतात, ती एकमेकांवर परिणाम करतात, तसेच एकत्रित परिणाम करतात.

मास्कचा आणि बिघडलेल्या संवादाचा काय संबंध आहे? प्रत्येक माणसाचे तोंड आणि नाक झाकलेले असते. त्यामुळे एकमेकांच्या भावना, विचार आणि मते समजून घेणे अवघड जाते. पण शाब्दिक अर्थ समजून घेण्यासाठी नेमक्या याच गोष्टींची गरज असते. समोरचा माणूस ओळखणेही अवघड असते, आणि एकमेकांच्या भावना वाचणेही अवघड झाल्यामुळे संवाद बिघडतो.

मास्कसह आणि मास्कशिवाय भावना कशा समजून घेतल्या जातात, याचा मानसशास्त्रविभाग, बामबेर्ग युनिव्हर्सिटी येथे अभ्यास केला गेला. यासाठी दुःख किंवा आनंद अशा एकूण सहा भावना वापरल्या गेल्या. यातून अगदी अपेक्षित गोष्टी समोर आल्या. मास्कमुळे “प्रयोगात भाग घेणाऱ्यांची भावना वाचण्याची कुवत कमी झाली.” विशेषकरून आनंदाची भावना ओळखायला अवघड गेलं, कारण आनंद ओठांवर दिसतो, आणि मास्कमुळे ओठ दिसतच नाहीत.

भावनांबद्दल चुकीचे अंदाज कशामुळे लावले जातात? एक कारण म्हणजे, चेहऱ्याचा मोठा भाग झाकल्यामुळे भावना नीट दिसू शकत नाहीत, आणि दुसरे कारण, आपल्याला आपला अंदाज बरोबर असेल अशी खात्री वाटत नाही. त्यामुळे भावनांकडे दुर्लक्ष केलं जाण्याची शक्यता वाढते. याचाच दुसरा अर्थ असा, की संवाद कसा होतो हे चेहऱ्यावरच्या भावना दिसण्यावर अवलंबून असते.

यावर उपाय काय? गैरसमज टाळण्यासाठी आपण इतर उपाय योजले पाहिजेत. शब्दातून आणि हातवाऱ्यातून भावना व्यक्त करायला शिकले पाहिजे, आणि समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे कमी लक्ष देऊन, संवादाच्या इतर पैलूंकडे लक्ष द्यायला शिकले पाहिजे. आणखी एक उपाय म्हणजे, संवाद जमेल तितका सोप्या पद्धतीने साधणे आणि एकमेकांना समजून घेण्यात मदत करणे.  😦

आधारितः  https://www.wissen.de/corona-masken-kommunikation-trotz-mundschutz

%d bloggers like this: