विज्ञान केंद्रा विषयी

विज्ञान केंद्र हा लोक विज्ञान उपक्रम आहे. प्रयोग, प्रकल्प,  प्रशिक्षण आणि प्रबोधन ही या उपक्रमाची चतुःसूत्री आहे.

 • पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विज्ञानाचा अभ्यास करणे.
 • प्रयोग करणे, त्यातून प्रकल्प साकारणे, प्रकल्पातून पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान विकसित करणे.ते साऱ्यांसाठी खुले करणे व त्याचा प्रसार करणे.
 • नव्या मुक्त संगणक प्रणाली लिहिणे. अस्तित्वात असलेल्या मुक्त संगणक प्रणालींचा प्रसार करणे.
 • विज्ञान केंद्र निर्मित पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे.
 • पर्यावरण व तंत्रज्ञानाविषयी लेखन करणे. ते साहित्य (पुस्तिका व लेख) प्रकाशित करणे.
 • सर्वसामान्यांचे विज्ञान विषयक प्रबोधन करणे. विज्ञान केंद्राच्या उपक्रमांविषयी व विकसित केलेल्या तंत्रज्ञाना विषयी इंटरनेटवर माहिती प्रकाशित करणे.  वैज्ञानिक प्रकल्प पुस्तिका, लेख व माहिती मराठीत प्रसिद्ध करणे आणि या तंत्रज्ञानाचा प्रसार करणे. (If you are interested in these projects, but don’t know Marathi well, please contact us.) या प्रकल्पांमधे तुम्हाला रस असेल पण तुम्हाला मराठी येत नसेल तर आमच्याशी संपर्क साधा.

या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात मराठीचा वापर केलेला आढळेल. मात्र काही तंत्रज्ञान विषयक प्रकल्प, लेख इंग्रजीत आहेत. तुम्हाला ते मराठीत पाहिजे असल्यास कृपया संपर्क साधा.

विज्ञान तंत्रज्ञान संबंधी विषयांवर तुम्ही येथे चर्चाही करू शकता. मात्र त्यासाठी तुम्ही केंद्राचे सदस्य असणे आवश्यक आहे. अधिक माहिती साठी संपर्क साधा.

विज्ञान केंद्र काय आहे ?

 • विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर थेट सामान्य माणसासाठी व्हावा यासाठीचा सेवाभावी उपक्रम
 • निसर्गस्नेही तंत्रज्ञानाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट
 • प्रयोग, प्रकल्प, प्रशिक्षण आणि प्रबोधन या चतुःसूत्रीवर आधारित कार्यक्रम
 • स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवण्याची क्षमता निर्माण करण्याची धडपड
 • प्रत्येकाकडून त्याच्या कुवतीनुसार घेऊन प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार देण्याचा ध्यास