विज्ञान केंद्रातर्फे विविध उपक्रम केले जातात. सध्या चालू असणाऱ्या उपक्रमांची माहिती येथे दिली आहे.
स्वतःच स्वतःचे संकेतस्थळ (वेबसाइट) बनवा
दि. २४ मार्च २०१९ रोज सकाळी ९-३० ते १३-३० या कालावधीत विज्ञान केंद्रातर्फे स्वतःचे संकेतस्थळ (वेबसाइट) बनवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
- या कार्यशाळेत एकूण ५ जण सहभागी झाले व त्यांनी स्वतःची वेबसाइट तयार केली.
- वेबसाइट बनवण्यासाठी कोणताही खर्च आला नाही.
- वर्डप्रेस या मुक्त प्रणालीचा वापर करून wordpress.com च्या सर्व्हरवर ही संकेतस्थळे निर्माण करण्यात आली.
- मार्गदर्शन निःशुल्क होते.
गणित साक्षरता उपक्रम
सर्वसामान्य लोकांना गणिताची वाटणारी भीती घालवण्यासाठी विज्ञान केंद्रातर्फे याच संकेतस्थळावर एक व्याख्यानमाला सुरू होते आहे. त्या व्याख्यानांविषयीची ही प्रस्तावनाः
संगणकावर मराठी टंकलेखन प्रशिक्षण
-
- संगणक प्रणाली – लिनक्स
- लेखन प्रणाली – लिबर ऑफिस
- अक्षरवळण – युनिकोड
- वेळ सायं. ४-३० ते ५-१५, ५-३० ते ६-१५, विज्ञान केंद्र तळेगाव येथे
- तुमच्या घरातील संगणकावर (निःशुल्क) लिनक्स बसवून त्यावर मराठी टंकलेखनाची सोय स्थापित केली जाईल. त्यासाठी संगणक विज्ञान केंद्र येथे आणावा लागेल
- प्रशिक्षण घ्यायचे असल्यास संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक
लोक-विज्ञान वाचनालय
-
- विज्ञान संबंधित दोन (जुनी किंवा नवी) पुस्तके देणगीदाखल दिली की या वाचनालयाचे सदस्य होता येते.
- काही (संदर्भ) पुस्तके विज्ञान केंद्रातच वाचण्यासाठी उपलब्ध होतात.
- अनेक पुस्तके एका वेळी एक या पद्धतीने सदस्यांस घरी नेऊन वाचता येतात.
- वाचक व्हायचे असल्यास संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक
ऑडिओ एडिटिंग प्रशिक्षण
-
- संगणकावर आवाजाचे रेकॉर्डिंग करणे, व बदल दुरुस्ती करणे
- संगणक प्रणाली – लिनक्स
- एडिटिंग प्रणाली – ऑडॅसिटी
- एकूण प्रशिक्षण कालावधी – एक महिना
- प्रशिक्षण निःशुल्क
- प्रशिक्षण घ्यायचे असल्यास संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक
सोलर पॅनेल वर चार्ज होणारा एल्. इ. डी. दिवा बनवणे
-
- प्रशिक्षण निःशुल्क
- साहित्य खर्च ज्याचा त्याने करायचा आहे.
- प्रशिक्षण घ्यायचे असल्यास संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक