विज्ञानदूत

काही वर्षांपूर्वी विज्ञानदूत हे मासिक आम्ही चालवत होतो. (जुने अंक डाउनलोड इथे करू शकता) ते कागदावर छापून वितरित होत होते. विज्ञानदूत नव्या इ-रुपात आता पुन्हा एकदा सर्वांना उपलब्ध होईल. वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत”

कोकणचा सडा : एक नैसर्गिक वारसा

डॉ.अपर्णा वाटवे या गेली काही वर्षे पर्यावरण या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचा सध्याचा प्रकल्प कोकणवासियांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. त्या प्रकल्पाबद्दल त्यांच्याच शब्दात वाचा….
वाचन सुरू ठेवा “कोकणचा सडा : एक नैसर्गिक वारसा”

ओला कचरा- समस्या आणि उत्तर

डॉ.संजीव कुलकर्णी हे सूक्ष्मजीवशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्राचे तज्ञ आहेत. त्यांचा हा लेख वाचकांना नुसता माहितीपरच नव्हे तर बोधप्रद ठरावा. या विषयावर वाचकांपैकी कोणी गंभीरपणे कृती केली असेल तर विज्ञान केंद्राशी जरूर संपर्क साधा.

 

वाचन सुरू ठेवा “ओला कचरा- समस्या आणि उत्तर”

जीवामृताचे प्रयोग

प्रा.ड़ॉ. अविनाश दांडेकर महाराष्ट्रातील एका कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्यांनी केलेल्या जीवामृतासंबंधीच्या प्रयोगाची माहिती त्यांनी  विज्ञान केंद्रासाठी पाठवली आहे. घर तेथे भाजीबाग या विज्ञान केंद्राच्या प्रकल्पासाठी ही माहिती उपयुक्त आहे. त्यातील गायीचे शेण व मूत्र या ऐवजी जैव वायु संयंत्रातून बाहेर येणारी स्लरी देखील वापरता येऊ शकते. डॉ. दांडेकर यांनी स्वतःच प्रयोग करून तसा अनुभव घेतला आहे. वाचन सुरू ठेवा “जीवामृताचे प्रयोग”

थ्री फेज विद्युत

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मायक्रोकंट्रोलर या विषयावर मी या विषयाची ओळख करून देणारे भाषण केले होते. संस्थेच्या सचिवांना मी मराठीत बोलू का इंग्रजीत असे विचारल्यावर “हे विचारून तुम्हीच माझा प्रश्न सोडवला आहे” असे ते म्हणाले. ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना (त्यांच्या अनेक शिक्षकांना सुद्धा) मराठीत विषय समजून घेणे सोयीचे जाते असा माझा अनुभव त्यांना मी सांगितला आणि मराठीत बोलण्याचा माझा विचार मी बोलून दाखवला. वाचन सुरू ठेवा “थ्री फेज विद्युत”

सौर ऊर्जेचे मापन

निखिल सालोरकर आणि मयूर राक्षे या स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली सौर उष्णतेचे मापन करण्याचा प्रयोग केला होता. त्याचे निष्कर्ष पुढे देत आहोत. हा प्रयोग करताना डी. वाय्. पाटील महाविद्यालयाचे डॉ. पुरुषोत्तम डांगे यांचे मौलिक सहकार्य लाभले.  वाचन सुरू ठेवा “सौर ऊर्जेचे मापन”

स्वयंपाकघरातील इंधन बचत

तुमच्या स्वयंपाकासाठी गॅस तुम्हीच बनवा !

ही घोषणा आता आम्ही प्रत्यक्षात आणली आहे. जैविक कचरा खाऊन आणि अक्षरशः पचवून त्याचे रूपांतर मिथेन इंधनात करणारे संयंत्र आम्ही १४ महिन्यांपूर्वी आमच्या कडे बसवले. गेले वर्षभर, आम्ही आमच्या स्वयंपाक इंधनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झालो आहोत. वाचन सुरू ठेवा “स्वयंपाकघरातील इंधन बचत”

ऑक्टेव्ह आलेख

ठराविक गणिती संबंध आलेखातून फार उत्तम रीतीने व्यक्त करता येतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील तीन फेजेस ची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एकमेकांपासून १२० अंशांच्या फरकाने फारकत झालेली तीन व्होल्टेजेस हाताने आलेख कागदावर निरनिराळ्या रंगात काढता येतात. वाचन सुरू ठेवा “ऑक्टेव्ह आलेख”

विज्ञान केंद्राचे मुक्त प्रकल्प

मुक्त प्रकल्प म्हणजे काय ?

मुक्त प्रकल्प हा विज्ञान केंद्राचा कणा आहे. केंद्राचे सदस्य स्वतः प्रयोग करतात आणि त्यातील यशस्वी प्रयोगांचे रूपांतर उत्पादनांत करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला जातो. मुक्त प्रकल्पांची कल्पना मुक्त संगणक प्रणालीच्या (Free Software) धर्तीवर साकारली आहे. वाचन सुरू ठेवा “विज्ञान केंद्राचे मुक्त प्रकल्प”