गणित साक्षरता उपक्रम

सर्वसामान्य लोकांना गणिताची वाटणारी भीती घालवण्यासाठी विज्ञान केंद्रातर्फे या संकेतस्थळावर एक व्याख्यानमाला सुरू होते आहे. त्या व्याख्यानांविषयीची ही प्रस्तावनाः वाचन सुरू ठेवा “गणित साक्षरता उपक्रम”

बायनरी टायमर

बायनरी संख्या म्हणजे दोनच चिन्हांनी दर्शवलेली संख्या. संगणक याच प्रकारे संख्यांचा विचार करतो व कार्य करतो. यात केवळ एक व शून्य (किंवा चालू व बंद, उजेड अंधार) अशी दोनच चिन्हे वापरून कितीही लहान वा मोठी संख्या दाखवता येते. विज्ञान केंद्राच्या या प्रकल्पात २५५ मिनिटांपर्यंत काम करू शकणारा टायमर तयार केला आहे. मात्र या संख्या टायमरच्या डब्यावर बायनरी पद्धतीने दाखवल्या जातात. वाचन सुरू ठेवा “बायनरी टायमर”

दोन दुनिया – २

मागच्या लेखात व्यवस्था काळाला कशी प्रतिसाद देते याचा अभ्यास होता. या लेखात व्यवस्था वारंवारतेला कसा प्रतिसाद देते याचा अभ्यास आहे. त्या आधी कोणतीही व्यवस्था आणि वारंवारता यांचे खास नाते असते त्याबद्दल माहिती घेऊया. वाचन सुरू ठेवा “दोन दुनिया – २”

दोन दुनिया – १

भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि तंत्रज्ञान (टेक्नॉलजी) या दोन्ही क्षेत्रात नियमबद्धता महत्वाची ठरते. एखादी यंत्रणा किंवा व्यवस्था कोणत्या नियमांनुसार चालते याचा अभ्यास केला जातो. हा अभ्यास करण्यासाठी महत्वाचे अवजार असते ते म्हणजे गणित. ही व्यवस्था यांत्रिकी (मेकॅनिकल) असेल  तर तिचा अभ्यास करताना वस्तुमान, लांबी, काल, बल, वेग अशा परिमाणांचा विचार करावा लागतो. जर ही  विद्युत व्यवस्था असेल तर विद्युत-दाब (व्होल्टेज), विद्युत प्रवाह, विद्युत भार, आणि प्रवाहाला होणारा विरोध या परिमाणांचा विचार होतो. वाचन सुरू ठेवा “दोन दुनिया – १”

टाकीतील पाणी

विज्ञान केंद्रातर्फे वरवर साधे वाटणारे अनेक प्रयोग केले जातात आणि त्याच्या मागचे मूळ तत्व अभ्यासले जाते. या वेळच्या प्रयोगात टाकीतील पाण्याची पातळी आणि वेळ यांचा अभ्यास करून एक गणिती प्रतिमान निर्माण केले आणि त्याच्या साह्याने किती वेळात टाकीच्या पाण्याची पातळी किती येते याचा अभ्यास केला गेला. वाचन सुरू ठेवा “टाकीतील पाणी”

आर्डुइनो

संगणक जगात सर्वत्र पोचल्यात जमा आहे. विशेषतः मोबाइलमधे ताकदवान छोटे संगणक आल्यावर संगणकांनी जग काबीज केले आहे असे म्हणता येते. मात्र संगणकात जे काही घडते ते केवळ त्याच्या पडद्यावर दिसते आणि फार तर स्पीकरवर ऐकू येते. ज्याला हात लावता येईल (tangible) अशा गोष्टी संगणक थेट निर्माण वा नियंत्रित करीत नाही. असे ‘स्पर्श्य’ जर घडवायचे असेल तर Physical Computing ची गरज आपल्याला भासते.

वाचन सुरू ठेवा “आर्डुइनो”

विज्ञान केंद्राचे पी.सी.बी.

इलेक्ट्रॉनिक नियंत्रक

विज्ञान केंद्रात विविध प्रकल्पांसाठी प्रयोग केले जातात. यशस्वी प्रयोगांतून उत्पादन निर्माण व्हावे असा प्रयत्न केला जातो. प्रयोग व उत्पादन यांचा तपशील विविध मुक्त परवान्या-अंतर्गत साऱ्यांसाठी खुला केला जातो. हल्ली अनेक घरगुती उपकरणांसाठी इलेक्ट्रॉनिक नियंत्रक वापरले जातात. त्यामुळे वेळ व ऊर्जा यांची बचत होते. अशा नियंत्रकांच्या आत छोटा संगणक असतो. त्याला मायक्रोकंट्रोलर म्हणतात. ए.व्ही.आर्. हा असा छोटा संगणक आहे.

वाचन सुरू ठेवा “विज्ञान केंद्राचे पी.सी.बी.”

हिरवी माया

विज्ञान केंद्राचा हा उपक्रम आहे. स्वयंपाकघरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट खतात करण्यासाठी “हिरवी माया”.

वाचन सुरू ठेवा “हिरवी माया”

मायक्रोकंट्रोलरची ओळख

मायक्रोकंट्रोलरची ओळख करून देणारे मराठी व्याख्यान. पुढील आकृतींचा संदर्भ या व्याख्यानात येतो…..

वाचन सुरू ठेवा “मायक्रोकंट्रोलरची ओळख”

“पट” ची भाषा

आपला खाजगी संवाद इतरांना कळू नये ही आपली नेहमीच इच्छा असते. त्यासाठी आपण कोणी राजा महाराजा किंवा सेनाधिकारी असण्याची गरज नाही. लहानपणी आपण यासाठी पट ची भाषा वापरत होतो. त्यापट लापट चापट पपट टपट मापट रपट असं भराभर बोलून आपल्या एका सवंगड्याला सांगून दुसऱ्याला चापट मारवत होतो. इंटरनेटचा विकास झाल्यावर ह्या पटच्या भाषेने निराळे रूप घेतले. त्याला एनक्रिप्शन असं म्हणतात.

खाजगीपणा जपण्यासाठी , आपल्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी  ही नवी पटची भाषा आपल्या मदतीला धावून येते. त्याच बरोबर लपून छपून पापकृत्य करण्यासाठी अतिरेकी, किंवा प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्यासाठी  राजकीय पुढारीही त्याचा वापर करू शकतात. अर्थातच ही भाषा केवळ पट हा शब्द प्रत्येक अक्षरानंतर वापरण्या इतकीच मर्यादित नाही. ही भाषा अधिक प्रभावी होण्यासाठी ती अधिक क्लिष्ट होणं गरजेचं आहे. म्हणूनच गणित आणि  संगणकीय तंत्रज्ञान याचा वापर त्यासाठी अनिवार्य आहे.

समजा उत्सवचं ऊर्मीवर प्रेम आहे. (त्यांचं अजून लग्न झालेलं नाही 😉 ) . उत्सव ऊर्मीला पत्र पाठवू इच्छितो. आणि तुम्हाला ते पत्र वाचायला मिळू नये अशी त्या दोघांची अर्थातच इच्छा आहे.  त्यांनी जर एकमेकांतला हा लिखित संवाद एनक्रिप्शनचा उपयोग करून चालू ठेवला तर हे नक्कीच शक्य आहे. त्यासाठी ही दोघे इमेल करताना पुढील प्रकारे काळजी घेतात…..

  1. उत्सव स्वतःच्या संगणकाचा वापर करून एक “किल्ल्यांची जोडी ” तयार करतो. त्यातली सार्वजनिक किल्ली तो ऊर्मीला पाठवून देतो. खाजगी किल्ली स्वतःकडेच ठेवतो. ऊर्मीसुद्धा संगणक वापरू शकते. अशीच किल्ल्यांची जोडी ती तयार करते आणि स्वतःची सार्वजनिक किल्ली ती उत्सवला पाठवते.  एकदा या किल्ल्या तयार झाल्या की मग पुन्हा पुन्हा त्या तयार कराव्या लागत नाहीत.
  2. ऊर्मीच्या सार्वजनिक किल्लीचा वापर करून उत्सव आपला निरोप सांंकेतिक भाषेत रूपांतरित करतो (किंवा कुलुपबंद करतो). आणि तो निरोप ऊर्मीला पाठवून देतो.
  3. ऊर्मी स्वतःच्या खाजगी किल्लीने हे कुलूप उघडते आणि तिला तो निरोप समजतो. याच पद्धतीने उत्सवच्या सार्वजनिक किल्लीचा वापर करून ती त्याला कुलूपबंद पत्र पाठवते. आणि ते कुलूप तो त्याच्या खाजगी किल्लीने उघडतो.
  4. जोपर्यंत ऊर्मीची किंवा उत्सवची  खाजगी किल्ली तुमच्यापाशी नाही तोवर तुम्हाला हे पत्र वाचता येत नाही.
  5. दोघांच्या दोन्ही किल्ल्या म्हणजे प्रचंड मोठी संख्या असते. या संख्येचा आवाका साधारण ३८ आकडी संख्येपर्यंत जाऊ शकतो.  केवळ संगणकालाच हे कुलूप उघडता आणि बंद करता येते. त्यासाठी साधारण २ सेकंद इतकाच वेळ लागतो.  एकदा का या किल्ल्या तयार झाल्या की मग त्या पुन्हा पुन्हा वापरता येतात. किंवा गरज भासल्यास बदलताही येतात.

keys

इंटरनेटने जोडलेल्या जगात या सांकेतिक भाषेला प्रचंड महत्व आलं आहे. या भाषेच्या नियंत्रणाचे कायदे करण्याची आवश्यकता जगात अनेक पुढारलेल्या देशातल्या सत्ताधाऱ्यांंना वाटते. उद्याच्या जगाचे रूप ही सांकेतिक भाषा ठरवणार आहे.  त्या विषयी पुढील लेखात…..

शब्दशक्ती

आपला खाजगी संवाद इतरांना कळू नये ही आपली नेहमीच इच्छा असते. त्यासाठी आपण कोणी राजा महाराजा किंवा सेनाधिकारी असण्याची गरज नाही.

View original post 367 more words