मायक्रो कंट्रोलरचे विश्व- प्रकरण १

खर्च होणारी ऊर्जा

मायक्रो कंट्रोलर अतिशय कमी ऊर्जा वापरतो. घड्याळ जितके अधिक वेगवान, (कमाल मर्यादा 16MHz) तितका ऊर्जेचा खप अधिक. उदाहरणादाखल, 4MHz क्रिस्टलचे घड्याळ मायक्रो कंट्रोलरमधे वापरले तर ATMEGA8, 3-व्होल्ट सप्लायमधून, 25^{o}C या तापमानाला पुढील प्रमाणे ऊर्जा खर्च करतोः

कंट्रोलर कार्यान्वित असतानाः 3.6 mA
कंट्रोलर कार्यान्वित नसतानाः 1.0 mA
कंट्रोलर झोपी गेला असतानाः 0.5 \mu A

मेंदूला व्यायाम

पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.

  1. मायक्रो कंट्रोलर चिपमधे समावेश केलेले मेमरीचे प्रकार सांगा.
  2. ATMEGA8 या चिपला कोणती गणिती प्रक्रिया थेट करता येत नाही ?
  3. मायक्रो कंट्रोलरमधील कोणता भाग सर्वात किचकट समजला जातो ?
  4. टायमर काउंटर वापरण्याचा खरा फायदा कोणता ?
  5. टू वायर इंटरफेस वापरून आणखी एकच संगणक किंवा कंट्रोलर मूळ कंट्रोलरशी संवाद साधू शकतो. हे विधान चुकीचे असल्यास दुरुस्त करा.
  6. ऑसिलेटर नसेल तर मायक्रो कंट्रोलर काम का करणार नाही ?
  7. प्रोग्राम मेमरी आणि EEPROM या मधील फरक स्पष्ट करा.
  8. संवेदना (Input) आणि कृती (Output) या दरम्यान प्रोग्राम कोणती भूमिका बजावतो ?
  9. 256-101 ही वजाबाकी ATMEGA8 हा मायक्रो कंट्रोलर थेट करू शकेल ? का ?
  10. रीसेट सर्किटचे नेमके कार्य कोणते ?

तुमचे प्रश्न, शंका, सूचना (प्रशंसू) तुम्ही पुढील पत्त्यावर इमेल लिहून कळवा. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना अधिक उपयुक्त ठरू शकेल. धन्यवाद.