आरोग्य अध्याय

आयुर्वेदतज्ञ डॉ. विजय हातणकर यांनी लिहिलेली ही पुस्तिका विज्ञान केंद्राच्या संकेत स्थळावरून निशुल्क अवकरणासाठी (download) उपलब्ध आहे. चुकीच्या वागणुकीतून अपयश, अपयशातुून नैराश्य आणि नैराश्यातून येणारे मानसिक आणि शारीरिक आजार टाळण्यासाठी आवश्यक सद्वर्तनाची माहिती म्हणजेच ही पु्स्तिका.

आरोग्याचा संबंध आपण अनेकदा दवाखाना, इस्पितळ, औषधे यांच्याशीच लावतो. पण आरोग्याचा जीवनशैलीशी संबंध असतो याकडे आपण जवळपास दुर्लक्ष करतो. डॉ. हातणकरांनी वरवर अतिशय साध्या वाटणाऱ्या वर्तनसूत्रांतून आपले आरोग्य कसे उत्तम ठेवता येईल या विषयी विवेचन केले आहे. सर्वसामान्य माणसांच्या आरोग्यासाठीचा हा एक परिणामकारक ठरू शकेल असा कृती कार्यक्रमच आहे. त्यासाठी डॉ. विजय हातणकर यांचे विज्ञान केंद्र आभारी आहे.

या पुस्तिकेचे पुन्हा टंकलेखन करण्यात विज्ञानदूत अमृता पाटील या विज्ञान केंद्र सदस्याने  योगदान दिले आहे.

ही पुस्तिका येथे अवकरण करता येईल.